Ad will apear here
Next
डॉ. देगलूरकर यांना ‘चतुरंग’चा ‘जीवनगौरव २०१७’
डॉ. गो. बं. देगलूरकरपुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर झाला. तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

चतुरंग प्रतिष्ठानच्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ‘रंगसंमेलन २०१७’मध्ये डॉ. देगलूरकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. जीवनगौरव पुरस्काराचे यंदाचे २७ वे वर्ष आहे. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने डॉ. देगलूरकर यांची निवड केली. या समितीत विजय कुवळेकर, डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. कविता रेगे, अचला जोशी, डॉ. सागर देशपांडे आणि डॉ. शुभदा जोशी यांचा सहभाग होता.

मूर्तीशास्त्र आणि मंदिर स्थापत्यशास्त्र या आगळ्या वेगळ्या विषयात डॉ. देगलूरकर यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पायाभूत कार्य केले आहे. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती या नात्याने शैक्षणिक प्रशासनातील कुशलता आणि कार्यक्षमता राखत अनेक तरुण अभ्यासक घडवण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे. संस्कारभारती, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा आदी संस्थांच्या वाटचालीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.

डॉ. देगलूरकर यांच्या या अव्याहत कार्याची दखल घेऊन निवड समितीने या पुरस्कारासाठी त्यांची एकमताने निवड केली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZVGBI
Similar Posts
रंगसंमेलनात रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रम पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे येथे प्रथमच होणाऱ्या रंगसंमेलनात ‘चतुरंग’ने पुणेकर रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रम आखले आहेत. सॅक्सोफोन आणि बासरीच्या ‘नाद नभांगणी नाचतो’ या वादनजुगलबंदीने रंगसंमेलनाला सुरुवात होणार आहे. विद्वान पं. कद्री गोपालनाथ आणि पं. रोणू मजुमदार यांच्या या ‘वादनारंगा’ला पं. अरविंद आझाद (तबला) आणि बी
‘चतुरंग’चे ‘रंगसंमेलन’ प्रथमच पुण्यात पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या ‘रंगसंमेलना’चे यावर्षी प्रथमच पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. आजवरच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीत २२ वेळा मुंबईत आणि तीन वेळा गोव्यात झालेल्या रंगसंमेलन सोहळ्यात लता मंगेशकर, पु. ल. देशपांडे, सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. नारळीकर, डॉ. भटकर, साधना आमटे, पांडुरंगशास्त्री आठवले, डॉ
‘चतुरंग’च्या ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ला प्रतिसाद पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
‘मुक्तसंध्या’मध्ये उलगडला अशोक पत्कींचा सुरेल प्रवास पुणे : एकाहून एक सरस मालिकांची शीर्षकगीते, मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारी भावगीते यांपासून सुरू झालेल्या स्वर-शब्द मैफलीदरम्यान ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या सांगीतिक कारकीर्दीचा प्रवास रसिकांसमोर उलगडला. निमित्त होते ते येथील चतुरंग प्रतिष्ठान आयोजित ‘मुक्तसंध्या’ कार्यक्रमाचे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language